मना सज्जना- ‘लिव्ह इट’ म्हणजे पळ काढणं नाही



एक गोष्ट विचारू का?
आज सकाळपासून आतापर्यंत किती गोष्टी मनात फिरतायत.
कुणी काय बोललं?
कुठे चूक झाली.
कुणी दुर्लक्ष केलं.
आणि आपण त्यावर किती वेळ विचार करत बसलो.
दिवसभरात अनेक घटना घडतात.
काही सुखद.
काही बोचऱ्या.
पण अडचण किंवा संकट ते नसतं.
अडचण असते ती आपण त्या घटनेला धरून ठेवतो.
तिला मनात घर करायला जागा देतो.
एखादी गोष्ट घडते. ती संपते.
पण आपण ती मनात पुन्हा पुन्हा आठवतो.
वेगवेगळ्या शक्यता लावतो.
“असं झालं असतं तर.”
“तसं बोलायला नको होतं.”
आणि मन अस्वस्थ होत राहतं.
यातून बाहेर पडायचा एक सोपा मार्ग आहे.
त्यालाच आपण म्हणू शकतो, ‘लिव्ह इट’.
लिव्ह इट म्हणजे गोष्टींकडे पाठ फिरवणं नाही.
लिव्ह इट म्हणजे जबाबदारी टाळणं नाही.
तर घडलेल्या गोष्टीतून नेमकं काय घ्यायचं हे ठरवणं.
प्रत्येक घटनेत दोनच शक्यता असतात.
एकतर आपण त्यातून काहीतरी शिकलो.
किंवा आपल्याला कळलं की पुढे काय टाळायचं?
जर काही शिकलो असू.
तर ती घटना उपयोगी ठरते.
आणि मग तिला मनात अडकवून ठेवण्याची गरज नसते.
आणि जर काही शिकायला मिळालंच नसेल.
तर निदान एवढं कळतं.
की ही गोष्ट पुन्हा करू नये.
ही प्रतिक्रिया देऊ नये.
हा निर्णय टाळावा.
हे ठरवलं की गोष्ट संपते.
तिला पुन्हा पुन्हा मनात फिरवायची गरज राहत नाही.
मन हलकं होतं.
आणि दिवस पुढे सरकतो. लिव्ह इट म्हणजे विसरणं नाही.
लिव्ह इट म्हणजे निष्कर्ष काढून पुढे जाणं.
कारण प्रत्येक गोष्ट ओझं बनून वाहत बसलो.
तर मन थकणारच.
आज एक छोटा प्रयोग करून बघा.
दिवसात एखादी गोष्ट बोचली.
तर स्वतःला लगेच विचारा.
“यातून मी काय शिकलो?”
किंवा
“पुढे काय टाळायचं?”
उत्तर मिळालं.
की त्या गोष्टीला मनातून सोडून द्या.
तेच खरं लिव्ह इट आहे.
आणि मनासाठी.
हीच खरी विश्रांती आहे.
---------------------------------
फोटो साभार- गुगलचे आभार

Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ