मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…
आपण स्वतःशीच बोलणं विसरतो
आपण दिवसभर अनेकांशी बोलतो. पण स्वतःशी बोलणं विसरतो.
मन शांत बसलेलं असतं आणि आपण त्याला थोडाही वेळ देत नाही.
आपल्या भोवतालचे आवाज इतके मोठे असतात, की
या गोंगाटात आपण आपल्या मनाचा आवाजच ऐकू शकत नाहीत.
म्हणून कधीकधी मन रुसतं.
आणि आपण ते लक्षातही घेत नाही.
स्वतःशी संवाद तुटला की जीवन गोंधळवाणं होतं.
निर्णय चुकीचे होतात.
मनातला ताण वाढतो. आणि आपण कारण शोधत बसतो.
कारण एकच असतं.
आपण स्वतःचं ऐकून घेतलेलं नसतं.
कधी एखाद्या शांत क्षणी मन अलगद बोलायला लागतं.
ते म्हणतं, "थोडं थांब."
आपण मात्र पुढेच धावत राहतो.
ही धाव मनाला थकल्यासारखं करते.
आणि मग मन प्रश्न विचारतं.
"तू माझ्याशी बोलत का नाहीस?"
आपल्याला याचं उत्तर नसतं.
मनाला फार काही नको असतं.
फक्त थोडी दखल.
दहा मिनिटं एकांतात बसलो.
की मन आपोआप उघडतं.
विचार शांत होतात.
भावना हळूच सावरतात.
स्वतःशी प्रामाणिक राहिलं की मनही प्रामाणिक होतं.
आणि हे नातंच सगळ्यात महत्त्वाचं असतं.
आज एक क्षण स्वतःला देऊन बघा.
स्वतःला एक साधा प्रश्न विचारा.
“मी खरंच कसा आहे?”
मन उत्तर देईल आणि ते उत्तरच तुम्हाला पुढचा मार्ग दाखवेल. Thanks Google for photo.

Comments
Post a Comment