मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ

 सर्वांना आनंदी ठेवायला आपण जोकर नाहीत


आपण स्वतःला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो.

पण कधी याच प्रयत्नात आपण गोंधळून जातो.

आपल्याला वाटतं, सर्वांना आनंदी ठेवायला हवं.

पण ते शक्य नसतं.

हे आपण मान्य करत नाही.

मग मनात अपराधपणाची भावना वाढते.

आणि आपण स्वतःलाच दोष देतो.

कोणीतरी नाराज झालं की आपण अस्वस्थ होतो.

आणि स्वतःच्या मनावर ताण वाढवून घेतो.

खरं म्हणजे चांगुलपणा इतका जड नसतो.

तो हलका असतो.

पण आपणच त्याच्यावर अपेक्षांचं ओझं ठेवतो.

कधी एखाद्याने आपल्याबद्दल कोणताही गैरसमज करून घेतला आणि तो आपल्याला कळाला. तर 

आपलं मन वेदनेने विव्हळायला लागतं. 

आपण विचार करतो, "मी एवढं केलं तरीही असं का?"

आपला हाच विचार चांगुलपणाला कमकुवत करतो.

चांगुलपणा हा स्वतःसाठीही असू द्या. 

इतरांच्या मान्यतेवर तो अवलंबून नसावा. 

आपण निष्कपटपणे वागलो.

की मन शांत राहतं.

जगाच्या निर्णयांना जास्त महत्व दिलं.

की मन गोंधळतं.

म्हणून चांगुलपणाचं एक साधं सूत्र आहे.

दुसऱ्यांच्या आनंदासाठी झटताना स्वतःला विसरू नये.

स्वतःकडेही प्रेमाने पाहावं.

मनाला थोडं समजून घ्यावं.

चांगुलपणा दाखवण्याची गोष्ट नाही. ती जगण्याची गोष्ट आहे.

आज स्वतःला एक वाक्य सांगा.

“मी चांगला आहे. आणि मला त्यासाठी कोणाचं प्रमाणपत्र नको.”

हे वाक्य मनाला शांत करेल.

आणि चांगुलपणाला नवा अर्थ देईल. Thanks Google for Photo


Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल