मना सज्जना- आधार म्हणजे केवळ सल्ला देणं नाही
नात्याची खरी ताकद एकमेकांना समजून घेण्यात
एक प्रश्न विचारू का.
समोरची व्यक्ती गप्प आहे.
ती दुखावलेली दिसतेय.
तेव्हा आपण लगेच उपाय सांगतो का.
की आधी थांबून ऐकतो.
आपण बहुतेक वेळा सल्ले देतो.
“असं करू नका.”
आपण समोरच्याच्या मनःस्थितीचा विचार करत नाही.
प्रत्येक माणूस वेगळ्या मनोवस्थेत जगत असतो.
कुणी थकलं असतं.
कुणी गोंधळलेलं असतं.
कुणी आतून घाबरलेलं असतं.
पण ते नेहमी शब्दांत सांगता येत नाही.
नात्यात आधार म्हणजे लगेच उत्तर देणं नाही.
आधार म्हणजे समोरच्याच्या भावनेला जागा देणं.
“तुला असं वाटणं समजण्यासारखं आहे.”
हे एक वाक्य अनेक जखमा भरून काढतं.
आपण अनेकदा समोरच्याच्या वेदनेशी स्पर्धा करतो.
“माझ्याबरोबर याहून वाईट घडलं होतं.”
हे बोलून आपण नकळत समोरच्याचं दुःख लहान करतो.
आणि नात्यात अंतर वाढतं.
मनःस्थिती समजून घेण्यासाठी मोठं कौशल्य लागत नाही.
थोडं थांबणं लागतं.
थोडं ऐकणं लागतं.
आणि थोडं स्वतःला बाजूला ठेवणं लागतं.
कधी समोरच्याला उपाय नको असतो.
त्याला फक्त कुणीतरी सोबत हवं असतं.
शांतपणे बसलेलं.
न विचारता समजून घेणारं.
नात्यात आधार बनायचं असेल.
तर आधी आपली प्रतिक्रिया तपासावी लागते.
मी ऐकतोय का.
की फक्त उत्तर देण्याची घाई करतोय.
आपण एकमेकांच्या मनोवस्थेचा आदर केला.
की नात्यांत सुरक्षितता येते.
मन मोकळं होतं.
आणि विश्वास वाढतो.
नात्यांची खरी ताकद.
एकमेकांना बदलण्यात नाही.
तर एकमेकांना समजून घेण्यात असते.
आज एका नात्यात इतकंच करून बघा.
बोलण्याआधी ऐका.
समजून घेण्याचा प्रयत्न करा.
कदाचित.
तुम्ही कुणासाठी मोठा आधार बनाल.
--------------------------------------
फोटो साभार, गुगलचे आभार

Comments
Post a Comment