मना सज्जना- अपेक्षा हे दुःखाचे मूळ कारण

मी आज कोणत्या अपेक्षेचं ओझं उगाच वाहतोय का?


आपण सगळेच काही ना काही अपेक्षा ठेवतो.
नात्यांतून, कामातून, स्वतःकडूनही.
अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही.
पण त्यांचं ओझं कधी वाढतं, हे कळतही नाही.

आपण अनेकदा मनातच ठरवून टाकतो.
तो असं वागेल. ती तसं बोलेल. हे झालं पाहिजे.
आणि ते झालं नाही, की मन दुखावतं.

समोरच्याने काही चुकीचं केलं.
का आपली अपेक्षा पूर्ण झाली नाही.
हे दोन वेगळे मुद्दे आपण एकत्र करून टाकतो.
आणि मग नात्यांमध्ये ताण निर्माण होतो.

अपेक्षा न बोलता ठेवलेल्या असतात.
म्हणून त्या पूर्ण न झाल्या की राग येतो.
आपण म्हणतो, “इतकं तरी कळायला हवं होतं.”
पण समोरच्याला आपल्या मनातलं कसं कळणार.

अपेक्षांचं ओझं वाढलं की आयुष्य जड वाटायला लागतं.
लहान गोष्टींचाही त्रास होतो. समाधान कमी होतं.
आणि सतत काहीतरी कमी पडतंय असं वाटत राहतं.

खरं तर अपेक्षा पूर्णपणे टाळता येत नाहीत.
पण त्यांचं प्रमाण आपल्या हातात असतं.
सगळं आपल्या मर्जीप्रमाणे होईल,
हा हट्ट सोडला. की मनाला थोडी मोकळीक मिळते.

काही अपेक्षा सोडणं म्हणजे हार मानणं नाही.
तर वास्तव स्वीकारणं आहे.
प्रत्येक माणूस आपल्यापरीने प्रयत्न करत असतो.
हे उमजलं की राग कमी होतो.

अपेक्षा कमी केल्या. की कृतज्ञता वाढते.
जे आहे त्याची किंमत कळायला लागते.
आणि जे नाही त्यासाठी मन त्रास करून घेत नाही.

आपण इतरांकडून कमी अपेक्षा ठेवल्या.
पण स्वतःकडून मात्र जास्त दयाळूपणा ठेवला.
की आयुष्याचा ताण कमी होतो.
आणि नात्यांत मोकळेपणा येतो.

अपेक्षा म्हणजे आशा.
पण त्या जर अटी बनल्या.
तर आनंद कमी करतात.
हे लक्षात घेतलं पाहिजे.

आज स्वतःला एक साधा प्रश्न विचारा.
“मी आज कोणत्या अपेक्षेचं ओझं उगाच वाहतोय का?”
जर उत्तर होकारार्थी असेल. तर ती अपेक्षा थोडी सैल करा.

आयुष्य हलकं वाटायला लागेल.
मन शांत होईल.
आणि जगणं थोडं अधिक सोपं बनेल
---------------------------------.
-फोटो साभार, गुगलचे आभार





Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ