मना सज्जना - खोट्या माणसांचं काय करावं?
आपण अनेकदा असं म्हणतो.
आजकाल खोट्याची दुनिया आहे.
खरं बोलून निभाव लागत नाही.
प्रामाणिक राहिलं तर नुकसान होतं.
हे ऐकताना खरं वाटतं.
कारण आजूबाजूला खोटं वागणारी माणसं दिसतात.
दिखावा करणारे यशस्वी दिसतात.
आणि खरे राहणारे मागे पडल्यासारखे वाटतात.
पण जरा थांबून विचार केला.
तर एक प्रश्न उभा राहतो.
खऱ्याची दुनिया नाही.
म्हणजे खोट्याची दुनिया तरी कुठे आहे.
खोटं बोलून.
खोटं वागून.
खोटं आयुष्य जगून.
कोणी खरंच समाधानी असतो का.
खोटं यश दिसतं.
पण त्यामागचं मन कायम अस्थिर असतं.
खोटं हसू दिसतं.
पण त्यामागे भीती असते.
उद्या खरं उघड होईल का, ही.
दुसरे खोटे वागतात.
हे सत्य असू शकतं.
पण त्यामुळे आपणही खोटे वागायचं.
याला काही अर्थ आहे का.
आपण खरे राहतो.
ते जगासाठी नाही.
ते स्वतःसाठी असतं.
कारण खोटं जगताना.
आपल्यालाच स्वतःची भूमिका लक्षात ठेवावी लागते.
खरे राहणारा माणूस.
सगळीकडे जिंकतो असं नाही.
पण तो स्वतःशी हरत नाही.
आणि ही हार.
सगळ्यात महाग असते.
खोटं वागणं ही परिस्थितीची मजबुरी नसते.
ती एक निवड असते.
आणि खरे राहणंही.
हीसुद्धा एक निवडच असते.
आपण खरे राहिलो.
तर कदाचित सगळे आपल्याला दाद देणार नाहीत.
पण आपलं मन शांत राहील.
रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर.
आपल्याला स्वतःपासून लपावं लागणार नाही.
जग खोटं आहे म्हणून.
आपणही खोटं व्हावं.
हा व्यवहाराचा नियम नाही.
तो मनाचा पराभव आहे.
खऱ्याची वेगळी दुनिया नसते.
खोट्याचीही नसते.
दुनिया एकच असते.
फरक इतकाच असतो.
आपण त्या दुनियेत.
कोण म्हणून जगतो.
आणि शेवटी.
आपण जे आहोत.
तेच आपण जगतो.
हेच खरं आयुष्य आहे.
-----------------------------------------
फोटो साभार, गुगलचे आभार

Comments
Post a Comment