मना सज्जना- आपण मागे बोलणारे का समोर उत्तर देणारे?
आपण रोज समाजात वावरत असतो.
सोसायटीत.
गटात.
संघात.
मिटिंगमध्ये.
आणि तिथे एक चित्र वारंवार दिसतं.
काही माणसं असतात.
किंवा एखादा समूह असतो.
ज्यांचं वागणं आपल्याला खटकतं.
आपल्याला स्पष्ट वाटतं.
हे चुकीचं आहे.
हे अन्यायकारक आहे.
हे असं असायला नको.
मग काय होतं.
मागे बोलणं सुरू होतं.
खूप संताप.
खूप तिरस्कार.
इतका की ऐकणाऱ्याला वाटतं.
समोर आले तर हे लोक त्यांना जाब विचारतील.
थेट बोलतील.
खणखणीत उभे राहतील.
पण वास्तव वेगळंच असतं.
तीच व्यक्ती.
तोच समूह.
समोर येतो.
आणि अचानक आवाज बदलतो.
देहबोली बदलते.
मान खाली जाते.
शब्द गोड होतात.
आणि लाचारी स्पष्ट दिसते.
तेव्हा एक प्रश्न उभा राहतो.
खरं काय आहे.
मागे बोलणं.
की समोर वागणं.
मागे बोलणं जर खरं असेल.
तर समोर गप्प का.
आणि समोरचं वागणं जर खरं असेल.
तर मागे इतकी चीड का.
हा दुटप्पीपणा कुणाचा आहे.
त्या व्यक्तीचा.
की आपलाच.
आपण अनेकदा धाडसाऐवजी सुरक्षितता निवडतो.
समोर बोलायला हिंमत लागत असते.
पण मागे बोलायला काहीच लागत नाही.
मागे बोलणं म्हणजे संताप नाही.
तो असहायतेचा आवाज असतो.
आणि समोर लाचारपणा म्हणजे शहाणपण नाही.
ती भीती असते.
पण या दोन्हींच्या मध्ये.
आपण एक गोष्ट गमावतो.
ती म्हणजे आपली खरी ओळख.
आपण जर चुकीचं पाहतोय.
तर ते चुकीचं आहे हे सांगण्याचं धैर्य हवं.
आणि जर सांगू शकत नाही.
तर किमान मागे विष ओकू नये.
कारण अशी वागणूक.
ना समाज सुधारते.
ना नातं सुधारते.
फक्त वातावरण विषारी करत जाते.
पुरुष असो.
स्त्री असो.
वय कितीही असो.
पद काहीही असो.
एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.
मी जे मागे बोलतो.
तेच समोर बोलण्याची माझी तयारी आहे का?
जर उत्तर नाही असेल.
तर कदाचित दोष समोरच्याचा नाही.
तर आपल्याच मनाच्या ठेवणीचा आहे.
समाज बदलतो पण भाषणांनी नाही.
तो बदलतो प्रामाणिकपणाने.
आणि प्रामाणिकपणाची सुरुवात.
स्वतःपासूनच करावी लागते.
हेच.
मना सज्जना.
------------------------------------------
फोटो साभार, गुगलचे आभार

Comments
Post a Comment