मना सज्जना- सगळं शक्य आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा
आपण अनेक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहतो.
सल्ल्यासाठी.
मान्यतेसाठी.
आधारासाठी.
पण एक आधार मात्र सतत दुर्लक्षित राहतो.
तो म्हणजे स्वतःवरचा विश्वास.
आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला भीती वाटते.
कारण कधी तरी आपण चुकलो असतो.
कधी निर्णय फसलेले असतात.
आणि त्या आठवणी मनात ठसून बसतात.
मग प्रत्येक वेळी काही ठरवताना.
आतला आवाज कुजबुजतो.
“तुझ्याकडून होईल का?”
हळूहळू हा संशय सवय बनतो.
आपण स्वतःच्याच क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावतो.
इतरांवर विश्वास ठेवतो.
पण स्वतःवर नाही.
स्वतःवर विश्वास ठेवण्याची कला म्हणजे कधीच न चुकणं नाही.
ती म्हणजे चूक झाली तरी स्वतःची बाजू सोडून न देणं.
“मी गडबडलो.”
हे मान्य करणं वेगळं.
आणि
“मीच कमी आहे.”
हे मानणं वेगळं.
आपण अनेकदा या दोन गोष्टी गोंधळात टाकतो.
आणि स्वतःला कमी लेखतो.
स्वतःवर विश्वास हा एका दिवसात तयार होत नाही.
तो लहान लहान अनुभवांतून तयार होतो.
आपण घेतलेले छोटे निर्णय.
आपण पेललेली कठीण वेळ.
आपण सावरलेली दुःखं.
या सगळ्यांचा हिशोब मनात ठेवायला हवा.
पण आपण काय चुकलो.
याची यादी पटकन करतो.
आणि काय निभावलं.
हे विसरून जातो.
स्वतःवर विश्वास ठेवायचा असेल.
तर आधी स्वतःशी प्रामाणिक व्हावं लागतं.
आपल्या मर्यादा मान्य कराव्या लागतात.
आणि तरीही.
“मी प्रयत्न करू शकतो.”
हे स्वतःला सांगावं लागतं.
कधी आत्मविश्वास नसतो.
पण विश्वास तरी ठेवता येतो.
कारण आत्मविश्वास क्षणिक असतो.
विश्वास मात्र हळूहळू रुजतो.
स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस.
नेहमी जिंकत नाही.
पण तो स्वतःशी तुटत नाही.
आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं असतं.
आयुष्याच्या प्रवासात.
सगळे हात सोडतील कधी तरी.
पण आपण स्वतःचा हात धरून ठेवलाय.
तर पडतानाही.
उभं राहणं शक्य होतं.
स्वतःवर विश्वास ठेवण्याची खरी कला. ------------------------------------------ फोटो साभार, गुगलचे आभार.
.jpg)
Comments
Post a Comment