मना सज्जना- मन खूप धावतंय, जरा थांबा




आपण खूप वेगात जगतो.
उठल्यापासून झोपेपर्यंत काही ना काही करायचं असतं.
काम, फोन, मॅसेज, जबाबदाऱ्या.
थांबायला वेळच नसतो.
आणि तरीही आत कुठेतरी असं वाटत राहतं की आयुष्य हातातून निसटतंय.

वेग कमी करणं म्हणजे आळशीपणा नाही.
ते म्हणजे आयुष्याशी पावलं जुळवणं.
आपण इतक्या घाईत असतो की वर्तमान क्षण जगायलाच विसरतो.
शरीर पुढे असतं.
मन मात्र मागे अडकलेलं असतं.

वेग वाढला की चुकाही वाढतात.
नाती दुर्लक्षित होतात.
स्वतःच्या भावनांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.
आपण सगळं वेळेत करतो.
पण मनासाठी काहीच वेळ ठेवत नाही.

वेग कमी करण्याची कला म्हणजे सगळं थांबवणं नाही.
तर गरज नसलेली घाई थांबवणं.
प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देणं आवश्यक नसतं.
प्रत्येक निर्णय आत्ताच घ्यायलाच हवा असंही नाही.

आपण सतत पुढचाच विचार करतो.
पुढचं काम.
पुढचा टप्पा.
पुढचं यश.
पण आजचा क्षण कधीच पूर्ण जगला जात नाही.

वेग कमी केला.
की साध्या गोष्टी जाणवायला लागतात.
श्वास.
थकवा.
मनातली अस्वस्थता.
आणि त्यावर वेळेत उपाय करता येतो.

वेग कमी करणं म्हणजे स्वतःला विचारणं.
“हे आत्ता खरंच आवश्यक आहे का?”
हा प्रश्न अनेक अनावश्यक ताण दूर करतो.

आपण कायम धावत राहिलो.
तर कुठे जायचंय हेच विसरतो.
कधी थांबून पाहिलं.
तर दिशा स्पष्ट होते.

वेग कमी केल्यावर आयुष्य संथ होत नाही.
ते अधिक अर्थपूर्ण होतं.
निर्णय स्पष्ट होतात.
नात्यांत संवाद वाढतो.
आणि मनाला थोडी उसंत मिळते.

ही कला एका दिवसात येत नाही.
ती रोज थोडी थोडी शिकावी लागते.
आज पाच मिनिटं फोन बाजूला ठेवणं.
आज एखाद्या गोष्टीला ‘नंतर’ म्हणणं.
आज स्वतःसाठी थोडं थांबणं.

आयुष्य वेगासाठी नाही.
ते अनुभवासाठी आहे.
आणि अनुभव घ्यायचे असतील.
तर कधी तरी.
वेग कमी करायलाच हवा.
-------------------------------
फोटो साभार, गुगलचे आभार 

Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ