मना सज्जना- स्वतःवरचं प्रेम टिकवा
आपल्याला जगायला शिकवलं जातं.
पण जगण्याची कला कुणी शिकवत नाही.
शाळेत गुण मिळवायला शिकवतात.
घरात जबाबदाऱ्या शिकवतात.
समाजात निभावून घ्यायला शिकवतात.
पण मन सांभाळायला शिकवत नाहीत.
जगण्याची कला म्हणजे सगळं परफेक्ट करणं नाही.
ती म्हणजे अपूर्णतेसोबतही शांत राहणं.
कधी हरलो.
कधी गडबडलो.
तरीही स्वतःवरचं प्रेम टिकवणं.
आपण सतत “कसं जगायचं” याच्या यादी बनवत बसतो.
असं वागायला हवं.
तसं बोलायला नको.
इतकं कमवायलाच हवं.
पण “कसं वाटतंय” याकडे पाहायलाच वेळ मिळत नाही.
जगण्याची कला इथेच चुकते.
कारण आयुष्य नियमांवर नाही.
ते अनुभवांवर चालतं.
कधी परिस्थिती आपल्या बाजूची नसते.
कधी माणसं बदलतात.
कधी आपल्यालाच स्वतःचा अर्थ लागत नाही.
अशा वेळी स्वतःला दोष देत बसणं सोपं असतं.
पण स्वतःला समजून घेणं.
हीच खरी कला आहे.
जगण्याची कला म्हणजे प्रत्येक वेळी जिंकणं नाही.
ती म्हणजे हरल्यानंतरही स्टेबल असणं.
मनाला इतकं मजबूत बनवणं.
की ते स्वतःशी ते शत्रूप्रमाणे वागणार नाही.
आपण इतरांसाठी खूप काही करतो.
पण स्वतःसाठी थांबत नाही.
थोडा वेळ काहीही न करणं.
मनावर ओझं न ठेवता बसणं.
हाही जगण्याचाच भाग आहे.
जगण्याची कला म्हणजे सतत आनंदी दिसणं नाही.
कधी दुःखी असतानाही स्वतःला सावरणं
आजचा दिवस भारी गेला नाही.
हे शांतपणे स्वीकारणं.
आपण आयुष्याला खूप गंभीर बनवलं आहे.
प्रत्येक गोष्टीला अंतिम अर्थ लावतो.
पण काही गोष्टी तशाच सोडून देणं.
हेही एक महत्त्वाचं जीवनकौशल्य आहे.
जगण्याची कला शिकायला उशीर होत नाही.
ती रोज थोडी थोडी शिकता येते.
आज स्वतःला एवढंच विचारा.
“आज मी स्वतःशी कसा वागलो?”
जर उत्तर थोडं सौम्य झालं.
तर समजा.
जगण्याची कला हळूहळू उमगत आहे.
---------------------------------------
फोटो साभार, गुगलचे आभार

Comments
Post a Comment