मना सज्जना- ताण किंवा मन यापैकी एकालाच निवडा

 

ताणाचं असणं मनाला अस्वस्थ करतं

ताण कधीच गोंगाट करत येत नसतो.
तो कधीच आवाजही करत नाही.
पण त्याचे असणे मनाला अस्वस्थ करते.
आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
कारण आपल्याला वाटतं, “ही छोटी गोष्ट आहे.”
पण छोट्या गोष्टीच मोठं ओझं बनतात.
दिवसातून कितीतरी वेळा आपण स्वतःला ताण देतो.
आणि मनाला कधीच विश्रांती देत नाहीत.
कामाचं दडपण वाढतं की,
घरची जबाबदारी मनात फिरत राहते.
आपण थकतो.
पण थांबत नाही.
ताण मनात गर्दी करू लागतो.
विचार चक्रावतात.
भावना गुंततात.
आणि मन अस्थिर होतं.
कधी-कधी राग येतो.
कधी निराशा.
पण आपण या भावनांना फक्त दाबून ठेवतो.
मन हे सगळं शांतपणे झेलतं. आणि एक दिवस अचानक मन तुटतं.
तुटण्यापूर्वी मन आपल्याला संकेत देतं.
उदा. चिडचिड वाढते.
झोप कमी होते.
एकाग्रता ढळते.
हे संकेत ओळखले की ताण कमी करता येतो.
स्वतःला थोडा वेळ दिला.
तर मन पुन्हा शांत होतं.
श्वसनाचा छोटा व्यायाम केला.
तर ताण वितळायला लागतो.
आपण स्वतःसाठी दोन मिनिटं ठेवली.
तर मनाला नवा आधार मिळतो.
आज एक छोटं पाऊल टाका.
डोळे मिटा.
हळू श्वास घ्या.
आणि मनाला सांगा.
“मी तुझं ऐकतोय.”
ताण कमी होऊ लागेल.
आणि मन पुन्हा स्थिर बनेल. Thanks Google for photo.

Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ