मना सज्जना - आपण स्वतःला कमी लेखतो

स्वतःला दोष देणं आधी थांबवा


आपण अनेकदा स्वतःला कमी लेखतो.

आणि हे आपल्याला कळतही नाही.
एखाद्या कामात चुकलो.
की आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो. हा आपल्याच प्रती निर्माण झालेला कठोरपणा मनात घर करून बसतो.
आणि आपला आत्मविश्वास हळूहळू कमी व्हायला लागतो.
इतरांनी केलेली टीका काही काळासाठी मन दुखावेल. पण
स्वतःवरची स्वतःच केलेली टीका मनाला खोल जखम करते.
आपल्याला वाटतं, "मी काही विशेष नाही."
हा विचार पहिल्यांदा छोटा असतो.
पण नंतर तोच आपली ओळख बनतो.
आपण स्वतःला दोष देणं सोपं मानतो.
पण स्वतःचं कौतुक करायला मागेपुढे पाहतो.
माणूस परिपूर्ण नसतो.
पण प्रत्येकात काहीतरी विशेष असतं.
हे आपणच दुर्लक्षित करतो.
कधी एखादं छोटं यश मिळतं.
पण आपण त्याचं कौतुक करत नाही.
कारण मन आधीच ठरवून बसलेलं असतं की आपण अपुरे आहोत.
हा विचार बदलायला एकच मार्ग आहे.
स्वतःशी प्रामाणिक होणं. स्वतःला प्रत्येक गोष्टीत दोष देणं आधी थांबवणं.
स्वतःच्या चुका समजून घेणं.
पण त्या चुकांमध्येच अडकून न राहणं.
मनाला सांगणं की वाढ हळूहळू होते.
प्रत्येक दिवशी काहीतरी सुधारता येतं.
स्वतःवर रागावण्याऐवजी स्वतःला साथ द्यायला हवी.
आज एक छोटा प्रयोग करा.
आरशात बघा.
आणि स्वतःला सांगा.
“मी यशस्वी आहे. आणि स्वतःशी प्रामाणिक आहे.”
हे वाक्य मनाला नवी दिशा देईल. Thanks Google for Photo.

Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ