तुझी नी माझी भेट


















माहितीए मला आपलं ठरलंय ते……
….
….
माहितीए मला आपलं ठरलंय ते
नाहीच मुळी भेटायचं कधी

तरीपण
तरीपण

वेड्या मनाला असतेच बघ आस

घनदाट गर्दीत अचानक यावास तू समोर
तुला पाहून आनंदानं नाचावा माझ्या मनीचा मोर

कसेबसे शब्द जुळवून बोलण्यासाठी मी उघडावेत ओठ
अन् तू त्यावर ठेवावेस भावनेनं ओथंबलेलं एकच तुझं बोट

बोटाच्या आजूबाजूनं वहावं माझ्या डोळ्यांतलं काजळ
तुझ्या आश्वस्त नजरेनंच मिटवावं माझ्या मनीचं वादळ

सगळं जाऊन मग उरावं फक्त आपलं एकमेकांवरचं प्रेम

अन्….पुन्हा एकदा आपण गर्दीत मिसळून जावं अनोळखी चेहरे घेऊन
अन् पुन्हा एकदा तू असच मला भेटावं 
ओळखीचे सुर होवून....

फोटो:-  साभार गुगल

Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ