देवघर
पहाटेचा सूर्य आज चांदण्यांसम भासत होता...
मनात साचला होता अंधार...
किती ते द्वंद, किती ते विचारांचे डोंगर
शिखरांवर शिखरं.. नात्यांचा डोह..
डोंगरांतून वाहणाऱ्या झऱ्यांचे तुषार घ्यावे वाटत होते अंगावर..
पण डोहातही वणवा पेटलेला..
वणव्यात उभी होते मी...तशीच..निश्चल..
प्रश्नांचे वादळ मात्र घोंगावत होतं..
वणवा अधिक तीव्र करण्यासाठी..
प्रश्नांचे वादळ मात्र घोंगावत होतं..
वणवा अधिक तीव्र करण्यासाठी..
मी कधीच आशा केली नव्हती..तो विझेल याची
मला अपेक्षाही नव्हती... त्याची पुन्हा पेटण्याची..
मला अपेक्षाही नव्हती... त्याची पुन्हा पेटण्याची..
तरीही मी निश्चल...संवेदना शुन्य..
वाटंत होतं, डोहात बुडून जावं...आकंठ
निघूच नये त्यातून बाहेर कधी..
पण पेटलेल्या वणव्यातूनही मिळत होती..
तप्त लवचिकता... मनातील कठोर पाषाणांना फोडणारी...
निघूच नये त्यातून बाहेर कधी..
पण पेटलेल्या वणव्यातूनही मिळत होती..
तप्त लवचिकता... मनातील कठोर पाषाणांना फोडणारी...
तेही बरं भासत होतं...
वाटत होतं सूर्याचे किरण घ्यावेत असे अंगावर
...आणि सर करावेत ते आनंदाचे डोंगर...
पण तोही खूप दूर उभा....
कैक मैल..मनापासून..
वाटलं व्हावं पवनसूत आणि घ्यावं त्याला आपल्या कवेत..
पण जाणवलं....मनातलं काजळ उड्डाणच घेऊ देत नाहीए...
कैक मैल..मनापासून..
वाटलं व्हावं पवनसूत आणि घ्यावं त्याला आपल्या कवेत..
पण जाणवलं....मनातलं काजळ उड्डाणच घेऊ देत नाहीए...
जखडले गेलेत पाय...परंपरेत..तरी घ्यायची होती भरारी..
पण तोपर्यंत सूर्यास्त झालेला...
पण तोपर्यंत सूर्यास्त झालेला...
मी बसले हताश होऊन...एका अनामिकाची वाट पहात..
एक पांथिक.. जो बनेल न्यायाधीश आणि करेल माझा न्याय निवाडा..
मनाने होईल एकरूप आणि मला बहाल करेल तो प्रेमत्व
मग मी मिसळून जाईन त्यात आणि तेवत राहिल देवघरात..
मग मी मिसळून जाईन त्यात आणि तेवत राहिल देवघरात..
फोटो:- साभार गुगल

Comments
Post a Comment