आयुष्यातले सुंदर स्वप्न

माझ्या आयुष्यातलं सुंदर स्वप्न आहेस तू..
तुला आठवतेय ती आपली पहिली भेट..
काय बोलावं, दोघांनाही समजत नव्हतं..
डोळेच काय ते एकमेकांना बोलत होते..
तू जेंव्हा बागेत येशील का असं विचारलेलंस....
तेंव्हाच माझ्या मनानं तुला होकार दिलेला...
बागेत फिरताना तू खूप आढेवेढे घेत मला विचारलंस..
तुझा हात हाहात देशील का...
मी तेंव्हाच माझं मन तुला दिलेलं..
तुला आठवतं.. गाडीवर बसताना 
जरा अंतर हवं म्हणून लाजून तू पुढे सरकलास..
मी तेंव्हाच आपल्या दोघांतील अंतर संपवलं होतं. 
ती पाणीपुरी आठवतेय का? आपण पहिल्यांदाच एकत्र खाल्लेली..
तिची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय..
एकाच डीशमध्ये खाल्लेली ती पाणीपुरी...तुझी उष्टी होती..
तिची चवंच न्यारी..
तेंव्हाच मी तुझी चव चाखलेली...
तुला आठवतेय.. मंदिरात गेल्यावर मी कपाळाला कुंकू लावलेलं
ते पसरू नये म्हणून तू ते पुसलंस..
तेंव्हाच माझ्या मस्तकांच्या रेषांवर मी तुझंच नाव कोरलेलं..
तुला कदाचित माहिती नसेल.. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे..
तू श्वास आहेस माझा...
तूच माझ्या मनाचा राजा..
मी गणितातलं शून्य..
तू बेरजेतला गाजावाजा
तू जीवाची विश्रांती..
तू आयुष्यातली मन:शांती
असायस तू..
कसं सांगू.. माझ्यासाठी
माझ्यातलाच ‘ससा’यस तू..

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ