मना सज्जना- सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग




आपण रोज निर्णय घेत असतो.
काही छोटे.
काही आयुष्याला वळण देणारे.
पण निर्णय घेण्याच्या क्षणी मन सर्वात जास्त अस्वस्थ होतं.
कारण चूक झाली तर काय, ही भीती सतत सोबत असते.

आपल्याला निर्णय घ्यायला भीती वाटते.
कारण आपण निकालावर जास्त लक्ष देतो.
“हे ठरवलं आणि चुकलं तर?”
“लोक काय म्हणतील?”
या प्रश्नांमध्ये आपण अडकतो.
आणि निर्णय पुढे ढकलत राहतो.

निर्णय न घेणं हाही एक निर्णयच असतो.
फरक इतकाच.
तो आपण जाणीवपूर्वक घेत नाही.
आणि मग परिस्थिती आपल्यासाठी ठरवते.

निर्णय घेण्याची कला म्हणजे कायम योग्य ठरणं नाही.
ती म्हणजे त्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारणं.
चूक झाली.
तर स्वतःला संपवणं नाही.
तर दुरुस्त करणं.

आपण अनेकदा सगळ्यांचं ऐकतो.
सल्ले घेतो.
मतं विचारतो.
हे आवश्यकही असतं.
पण शेवटी निर्णय आपल्यालाच जगायचा असतो.
हे आपण विसरतो.

मन नेहमी ओरडत नाही.
ते हळूच संकेत देतं.
अस्वस्थता.
ओढ.
किंवा शांततेचा क्षण.
निर्णय घेताना या संकेतांकडे लक्ष द्यायला हवं.

निर्णय घ्यायचा म्हणजे घाई करायची गरज नाही.
पण कायम थांबत राहणंही योग्य नाही.
कधी माहिती पुरेशी झाली.
हे ओळखणं महत्त्वाचं असतं.

आपण परिपूर्ण निर्णयाची वाट पाहतो.
पण परिपूर्णतेची वाट पाहत राहिलो.
तर वेळ निघून जातो.
आणि संधीही.

निर्णय घेतल्यानंतर स्वतःशी कसं वागतो.
हे जास्त महत्त्वाचं असतं.
सतत मागे वळून पाहणं.
“दुसरं केलं असतं तर?”
हा विचार मनाला थकवतो.

निर्णय घेतला.
आणि तो त्या क्षणी योग्य वाटत होता.
एवढं मान्य केलं.
की मन हलकं राहतं.

निर्णय ही आयुष्याची दिशा ठरवणारी पावलं असतात.
ती भीतीने नव्हे.
तर आत्मविश्वासाने उचलली.
की आयुष्य आपलं वाटायला लागतं.हीच आहे.
निर्णय घेण्याची खरी कला.
------------------------------------------------
फोटो साभार, गुगलचे आभार 

Comments

Post a Comment